अभिनय कट्ट्याविषयी

अभिनय कट्टा | कला गुणांना वाव देणारे खुले व्यासपीठ

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी ठाणे शहराची ओळख गेल्या काही वर्षात प्रस्थापित होत आहे. हि ओळख निर्माण होण्यासाठी ज्या संस्थाचा मोलाचा वाटा आहे, त्यातील महत्वाची संस्था किंवा चळवळ म्हणजे 'अभिनय कट्टा'. ठाणे शहरात प्रवेश करताक्षणीच कला रसिकांना अत्यंत जवळ असणारे सांस्कृतिक केंद्र म्हणजे "अभिनय कट्टा" ! अभिनय कट्ट्याची स्थापना कला , सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील एक परिचित नाव असलेल्या श्री. किरण नाकती यांनी २७ फेब्रुवारी २०११ रोजी मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून 'आदित्य प्रतिष्ठान, ठाणे' या संस्थेच्या माध्यमातून केली.

पूर्ण वाचा

अभिनय कट्टा संस्कार शास्त्र

शिक्षण संस्कार

माहिती वाचा

नाट्य संस्कार

माहिती वाचा

साहित्य संस्कार

माहिती वाचा

क्रीडा संस्कार

माहिती वाचा

शिक्षण संस्कार

अभिनय कट्ट्याने शिक्षणाला कायमच महत्व दिले आहे. केवळ कला क्षेत्रातच नव्हे, तर कुठल्याही क्षेत्रात काम करताना शिक्षण आणि अभ्यास या अत्यंत आवश्यक गोष्टी आहेत. हे लक्षात घेऊनच अभिनय कट्ट्याने अभ्यास व परीक्षा यावर भर दिला आहे. दर महिन्याच्या पहिल्या रविवारी अभिनय कट्ट्याच्या कलाकारांची लेखी परीक्षा होते ज्या मध्ये ते अभ्यासासाठी दिलेल्या साहित्यिक (नाटककार / लेखक / कलाकार ) यांचे साहित्य अथवा कलाकृती यांचा अभ्यास करतात. त्याचप्रमाणे साहित्यिक / नाटककार / लेखक / कलाकार यांचे जीवनचरित्र देखील अभ्यासतात. या अभ्यासावर तसेच चालू घडामोडींवर आधारित ५० गुणांची लेखी परीक्षा अभिनय कट्ट्याचे सर्व कलाकार देतात. यातून विविध प्रकारच्या साहित्याचा, साहित्यिकांचा परिचय कट्ट्याच्या कलाकारांना होतो.साहित्यही कोणत्याही कलाकाराला समृद्ध करणारी गोष्ट असल्याने,अर्थातच कट्ट्याच्या कलाकारांना देखील याचा फायदा होतो आणि त्याचे प्रतिबिंब त्यांच्या उत्तरोत्तर प्रगल्भ होत जाणा-या सादरीकरणात पडते. परीक्षा झाल्यानंतर कट्ट्याचे अध्यक्ष श्री. किरण नाकती सर तसेच सुनिल गि-हे सर कट्ट्याच्या कलाकारांना नाट्याशास्त्र , अभिनय, कॅमेरा इ. घटकांबद्दल प्रात्यक्षिकसह मार्गदर्शन करतात.

नाट्य संस्कार

'अभिनय कट्टा' या संस्थेचे मूळच नाट्य संस्कार मध्ये रुजलेले आहे. कुठलाही कलाकार आपल्या अभिनय प्रवासाची सुरुवात करतो , ती रंगमंचवरून एकपात्री, द्विपात्री, नाटिका ,दीर्घांक व नाटक अशा नाट्यकलेशी संबधित घटकांपासूनच. येथेच कलाकारांचा अभिनयाचा पाया पक्का होत असतो. जाणीवा विकसित होत असतात. अभिनय कट्ट्यावर आतापर्यंत विविध एकपात्री, द्विपात्री, नाटिका, दीर्घांक, नाटक यांच्या माध्यमातून अनेक कलाकारांना आपल्या अभिनयाच्या गुणवत्तेचे अभिनय गुणांचे प्रदर्शन करण्याची संधी मिळाली आहे. यातूनच नाट्य विषयक जाण , समज याचे संस्कार कलाकारांवर झाले आहेत.

साहित्य संस्कार

उत्तम साहितीकांचे साहित्त्य हा कुठल्याही अभिनेत्याला / अभिनेत्रीला समृद्ध करणारा ठेवा असतो. साहित्याची उत्तम जाण असलेला कलाकार कोणतीही भूमिका जास्त चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो व सदर करू शकतो. भाषेची शुद्धता, साहित्त्याची जाण, शब्दांवर प्रभुत्त्व या कलाकारांसाठी आवश्यक गोष्टी आहेत. या सर्वांकरिता गरजेची असलेली गोष्ट म्हणजे उत्तम साहित्त्याचे वाचन. हे लक्षात घेऊनच अभिनय कट्ट्याने सदस्य कलाकारांसाठी मोफत वाचनालय सुरु केले आहे. आजमितीला कट्ट्याच्या वाचनालयात ६५० च्या आसपास पुस्तके आहेत. ज्यात जेष्ठ आणि श्रेष्ठ लेखकांचे उत्तमोत्तम कथासंग्रह, कादंब-या, नाटके, दीर्घांक व एकांकिका यांचा समावेश आहे. अभिनय कट्ट्याच्या कलाकारांना या सुविधेचा प्रचंड लाभ होत आहे. त्यामुळे कलाकारांच्या शब्द संपत्ती मध्ये भर पडते.

क्रीडा संस्कार

'खेळ' हा आपल्या आयुष्यातील महत्वाचा घटक. मैदानी खेळ तर विशेष महत्वाचे. त्यातून दमसास वाढणे, एकाग्रता याबरोबरच खिळाडूवृत्ती संघभावना, झुंझारवृत्ती यांचाही विकास होतो. एक उत्तम कलाकारासाठी या सर्व अत्यंत महत्वाच्या आहेत. याच उद्देशाने अभिनय कट्टा २०१३ पासून "अभिनय कट्टा क्रिकेट लीग" अर्थात "AKCL" या स्पर्धेचे आयोजन करीत आहे. कलाकारांचासुद्धा या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळतो आणि अर्थातच त्याचे सकारात्मक परिणाम कलाकार म्हणून विकसित होण्यावर होतात.

निसर्ग संस्कार

माहिती वाचा

समाज संस्कार

माहिती वाचा

बाल संस्कार

माहिती वाचा

नृत्य संस्कार

माहिती वाचा

निसर्ग संस्कार

अभिनय कट्टा निसर्गाच्या सान्निध्यात बहरला आहे. निसर्ग आपल्याला नेहमीच उर्जा, उत्साह, ताजेपणा देत असतो. आज ग्लोबल वार्मिंगचा प्रश्न उग्र होत असताना पर्यावरण रक्षणाचे महत्व सर्वांना समजणे व त्याबद्दल जागृती होणे आवश्यक आहे. म्हणूनच अभिनय कट्टा निसर्ग संस्काराला महत्त्व देतो. याचाच एक भाग म्हणून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे अनेक कार्यक्रम अभिनय कट्ट्याने राबविले आहेत. वृक्ष निसर्ग संवर्धनातील महत्वाचा घटक असल्याने वृक्षलागवड व संवर्धन महत्वाचे ठरते. निसर्ग सहल व त्या माध्यमातून सदस्य कलाकारांना निसर्गाच्या अधिकाधिक जवळ नेण्याचा प्रयत्न असतो.

समाज संस्कार

सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अभिनय कट्ट्याने समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन व मदत यामध्ये नेहमीच आपला सहभाग नोंदवला आहे. यामध्ये उल्लेखनीय म्हणजे रक्तदान शिबीर, गरजूंसाठी अल्पदरात वैद्यकीय सेवा, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत, त्सुनामी ग्रस्तांसाठी धान्य व जीवनावश्यक वस्तू पाठवण्याच्या कामात सक्रीय सहभाग, रेल्वे सुरक्षेबद्दलच्या जागृतीसाठी ' रेल्वे मेरी जान ' हे पथनाट्य, पोलिसांच्या मदतीसाठी बॉम्बस्पोटावर पथनाट्य असे अनेक सामाजिक उपक्रम अभिनय कट्टा व कट्ट्याची पितृसंस्था असणाऱ्या आदित्य प्रतिष्ठानने गेल्या कित्येक वर्षात राबवले आहेत.

बाल संस्कार

लहान मुल म्हणजे मातीचा गोळा. त्याला आकार द्यावा तसे ते घडते. म्हणूनच लहान वयातच मुलांवर योग्य संस्कार व्हावे, चांगल्या गोष्टी त्यांच्या मनावर बिंबवल्या जाव्यात, वाढत्या वयातच मुलांना चांगल्या वाईटाची जाण यावी यासाठी अभिनय कट्ट्याने बाल-संस्काराला कायमच महत्व दिले आहे. म्हणूनच संस्कार वर्ग, श्लोक , पाठांतर , महापुरुषांची ओळख, व्यसनमुक्तीचा प्रचार व प्रसार असे उपक्रम अभिनय कट्ट्याने राबविले आहेत. राष्ट्राची वर्तमान असणारी तरुण पिढी व राष्ट्रचे भविष्य असणारा बालक वर्ग शारीरिक व वैचारिकदृष्ट्या समृद्ध व निरोगी असला पाहिजे, असा सामाजिक ऋण मानणाऱ्या अभिनय कट्ट्याचा कटाक्ष असतो कारण 'निरोगी आणि संस्कारी मनेच निरोगी आणि संसाकारी समाज' घडवतात अशी अभिनय कट्ट्याची ठाम धारणा आहे.

नृत्य संस्कार

नृत्य हा कलेतला एक महत्वाचा घटक. अर्थातच शारीरिक तंदुरुस्तीसाठी देखील महत्वाचा. नृत्यातील लय, ताल, लवचिकता, चेर-यावारील हाव भाव,भावदर्शन या सर्व गोष्टी कलाकारांसाठी अत्यंत आवश्यक असतात. याची जाण कट्ट्याच्या कलाकारांना यावी म्हणून अभिनय कट्ट्यावर 'नृत्याभिनयाचे' आयोजन केले जाते. ज्यामुळे नृत्यात पारंगत नसणाऱ्या कलाकारांना देखील कलेचा भाग म्हणून नृत्याशी परिचय होतो.

 • अभिनय कट्ट्याविषयी सेलेब्रिटिंच मत

  मी असेन किंवा नसेन, पण अभिनय कट्टा असाच बहरत राहील.

  रमेश देव ( अभिनेते )

 • अभिनय कट्ट्याविषयी सेलेब्रिटिंच मत

  अभिनय कट्ट्यासारखी चळवळ मी संपूर्ण भारतात कुठे बघितली नाही.

  श्रीया पिळगावकर ( अभिनेत्री )

 • अभिनय कट्ट्याविषयी सेलेब्रिटिंच मत

  अभिनय कट्टा म्हणजे सोन्याची खाण

  सोनाली कुलकर्णी ( अभिनेत्री )

फोटो गॅलरी

आपण ग्लॅमरच्या पाठी धावायचं नसतं, आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर ग्लॅमरच आपल्या पाठी धावत आले पाहिजे..

- किरण नाकती ( संचालक, अभिनय कट्टा - सिने-नाट्य दिग्दर्शक )